‘मिर्झापूर २’ लवकरच प्रेकक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरच दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ॲमेझॉन प्राईमवरील ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या वेबसीरिजमधील ॲक्‍शन आणि कथा प्रेक्षकांना आवडली होती. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

आता लवकरच दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या वेबसीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्येही भरपूर ॲक्‍शन सीन्स असणार आहेत. या वेबसीरिजमधील ‘गुड्डू’ आणि ‘कालीन भैया’ हे पात्र फार गाजले होते. या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीजनमध्ये ‘गुड्डू’ आणि ‘कालीन भैया’ हे दोघेही समोरासमोर येताना दिसतील.

नुकताच समाजमाध्यमावर याचा व्हिडीओ पोस्ट करून त्यावर ‘मिर्झापूर सीझन २ जल्द आ रहा है... बजेगा पुरा बॅंड’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या कॅप्शनमुळे दुसऱ्या सीझनमध्ये नेमक काय होणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News