मीरा भाईंदर - छत्रीवाटपावरून महिला नगरसेविकांमध्ये झाली जोरदार हाणामारी, पहा व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • शिव्यांची लाखोली
  • नागरिक नाराज
  • पक्षांतर्गत संघर्षातून झाला वाद

मीरा रोड : गेल्या आठवड्यात मिरा रोडमधील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये पानाच्या टपरीमधून वादविवाद झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी भाजपच्या दोन महिला नगरसेविकांमध्ये वाद होऊन धक्काबुक्की आणि हाणामारी झाल्याची घटना घडली; या घटनेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

माजी महापौर गीता जैन यांच्या हस्ते छत्री वाटपाच्या कार्यक्रमात स्थानिक भाजप नगरसेविका रूपाली मोदी व त्यांच्या पतीने रविवारी सायंकाळी गोंधळ घातला. मेहता व जैन यांच्यातील वादंगातून हा प्रकार घडला.

मिरा रोड हटकेश भागातील कार्यकर्ते इमरान हाश्‍मी यांनी रविवारी सायंकाळी हाटकेश चौक येथे ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी रस्त्याच्या कडेला एक टेबल मांडला होता. गीता जैन तेथे पोहचल्यावर पाऊस आल्याने आयोजकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या शेडमध्ये टेबल घेत त्या ठिकाणी छत्री वाटप सुरू केले. याचवेळी नगरसेविका रूपाली मोदी पतीसह तेथे आल्या व इकडे काही कार्यक्रम करायचा नाही. आपल्या नगरसेवक निधीतून शेड बांधली असून परवानगी घेतली आहे का? चला बाहेर निघा, असे सर्वांना सांगू लागल्या. या वेळी जैन व मोदी यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली.

पक्षांतर्गत संघर्षातून झाला वाद
काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मोदी या पतीसह पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. पोलिसांनी इमरान यांनाही बोलावून घेत माहिती जाणून घेतली. दरम्यान, या घटनेमागे भाजपमधील अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचे मानले जाते. मोदी या भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या समर्थक मानल्या जातात; तर माजी महापौर गीता जैनदेखील भाजपच्याच असून त्यांनी मीरा-भाईंदर विधानसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न सुरू केल्याने या दोघांमध्ये वाद सुरू आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News