मनाला भिडणारी वारी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019

एकोप्याची वीण घट्टच संत तुकोबाराय वारी करत होते.

एकोप्याची वीण घट्टच संत तुकोबाराय वारी करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शेकडो वारकरी. जात होते. वाटेत एकदा असाच पाऊस आला. काय करावे कळत नव्हते. शेजारीच मशीद होती. मुस्लीम बांधवानी ती मशिद खुली करून वारकऱ्यांना स्थान दिले. वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण केले. त्यावेळी जगदगुरू संत तुकोबारायांनी रात्री किर्तन केले. त्यात अल्ला देवे अल्ला दिलावे... असा अभंग जाग्यावर रचला. त्या दिवसापासून वारी सर्व समाजाची झाली.

 सर्व समावेशक झाली. ती एकोप्याची वीण वर्षानु वर्षे, युगान युगे चालत आली आहे. संत तुकोबराय पालखी सोहळा यवत मुक्कमी आला. तेथे एकोप्याची वीण अधिक घट्ट झाल्याची दिसली. पालखीत वारकऱ्यांना सर्व धर्मीय दाते मिळतात. यवतलाहू मुस्लीम समाज जेवण देतो. मात्र आज यवत मुक्कामी सोहळा आला मात्र एकदशी होती. लोकांचे उपवास होते. यवत गावकरी झुणका भाकर अस पारंपारिक जेवण करतात. मात्र यंदा भगर केली तीही सातशे किलो. 

मुस्लीम समाजही जेवण करतो. मात्र एकादशी आल्याने मुस्लीम समाजाने चक्क खिचडी केली, तीही शंभर किलो. यवतला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुस्लीम समाजाकडून दर वर्षी जेवण दिले जाते. या वर्षी येथील दर्गाह मध्ये शंभर किलो साबुदाण्याची खिचडी बनवण्यात आली होती. मागील अनेक वर्षांपासून धार्मिक सलोख्याची परंपरा जपली जात आहे. ती सलोख्याचू वीण अधिक घट्ट होत आहे. यवत येथील, मुस्लीम समाजाचे तरूण वारकऱ्यांच्या सेवेसाठी दर वर्षी तत्पर असतात.  

ग्रामस्थांतर्फे वारकऱ्यांना जेवण दिले जाते. त्यात मुस्लीम समाजही मागे नसतो. येथील दर्गाहमध्ये मुस्लीम  तरूण एकत्र येत वारकऱ्यांसाठी जेवण बनवतात. या वर्षी पालखी मुक्कमाच्या दिवशी उपवासाचा दिवस असल्याने या तरूणांनी खिचडीचा बेत आखला होता. शंभर किलो साबुदान्यापासून येथे खिचडी बनवण्यात आली होती. हिदु- मुस्लीम समाजातील एकोप्याचे उत्तम उदाहरण आहे. धार्मिक सलोखा वाढवणाऱ्या  उपक्रामाचे समाजातून स्वागत झाले.

उपक्रमामध्ये समीर सय्यद, रौफ सय्यद, लिकायत शेख, फिरोज मुलाणी, अझमुद्दीन तांबोळी यांच्यासह अनेक तरूण दर वर्षी सहभागी होत असतात. ग्रामस्थ व पालखी सोहळ्याच्या वतीनेही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. अर्थकारण, राजकारण व समाजकारण अशी तिन्ही ठिकाण हॉट असतात. पण आपण पेरतोय काय अन् उगवेल काय याचा सारासार विचार करून लोकांच्या भल्यासाठी जगणारे अनेक जण असतात. त्यांच्यामुळच समाज पुढ जात असतो. 

सर्वसाधरण जगताना रमजान महिन्यात रोजा न धरणाऱ्या मुस्लीम बांधवाला हिंदू तर एकादशी न धरणाऱ्या हिंदू बांधवाला मुस्लीम मित्र शिव्या घालत असतो. असा इतका एकोपा रूढ असताना त्याला छेद देणारी ताकद वाढूच शकत नाही. ती ताकद वाढतेय अस लक्षात जरी आल तरी सोहळ्यातील असे अनेक एेकोप्याच् कप्पे त्यी ताकदीली पुरून उरतील. असेच म्हणावे लागेल...

सचिन शिंदे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News