MHT-CET निकाल जाहीर; मुंबईची किमया, अमरावतीचा सिद्धेश ठरले टॉपर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

विद्यार्थ्यांना मध्यरात्रीपासून निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल ९९.९८ टक्के गुणांसह टॉपर ठरले आहेत. 

राज्यातील तीन लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर २०, ९३० विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) या विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News