स्त्रियांबद्दलची मानसिकता बदलायला हवी... 

संकेत मुनोत
Wednesday, 7 August 2019

"मेरे कुंवारे दोस्तों करों तैयारी, 15 अगस्त के बाद कश्मीर में हों सकती हैं ससुराल तुम्हारी". कल्पना करा तुमच्या घरातील मुलींचे वा बहिणीचे असे फोटो पाठवून कोणी असे काही लिहले तर काय वाटेल तुम्हाला?
(संपर्क Email- Changalevichar1@gmail.com)

दोन दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी काश्मीरमधील मुलींचे काही फोटो व्हायरस झाले असून सोबत लिहले आहे की "मेरे कुंवारे दोस्तों करों तैयारी, 15 अगस्त के बाद कश्मीर में हों सकती हैं ससुराल तुम्हारी". कल्पना करा तुमच्या घरातील मुलींचे वा बहिणीचे असे फोटो पाठवून कोणी असे काही लिहले तर काय वाटेल तुम्हाला?

जेवढ्या तिकडच्या मुली सुंदर आहेत तेवढीच काश्मीरची मुलेही सुंदर आहेत मग द्याल का तुमच्या घरातील मुली तुम्ही तिकडच्या मुलांना? 
आपण ज्या छत्रपती शिवरायांचे सतत नाव घेतो त्यांच्या अगदी विरुद्ध वागत नाही का आपण? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा शिवाजी राजांकडे त्यांच्या एका सरदाराने भेट म्हणून पुढे आणले तेव्हा राजांनी मानसन्मान देऊन त्या सुनेला परत पाठविले होते तेही अश्या काळात ज्या काळात युद्धामध्ये हरल्यानंतर शत्रूच्या स्त्रियांची विटंबना केली जाई. 

स्त्रियांना भेटवस्तू म्हणून दिले जाई, युद्धात पकडल्या गेलेल्या स्त्रियांना बळजबरीने जनानखान्यात कोंबले जाई किंवा लग्न लावले जाई. शत्रूकडच्या महिलांकडे ही सन्मानाची वागणूक देणाऱ्या राजांकडून काय आदर्श घेतोय आपण? जेव्हा एखाद्या देशासोबत क्रिकेट मॅच असते वा कुठली घटना घडते तेव्हा ही त्या त्या देशाबद्दल अश्याच प्रकारचे मेसेज आणि सोबतच त्या त्या क्रिकेटर च्या आई बहिणींचा उद्धार मोठ्या प्रमाणात केला जातो.

प्रत्येक वेळी त्या-त्या स्त्रियांना टार्गेट करणे आवश्यक असते का? आपापसात ही शिव्या देतांना लगेच समोरच्याच्या आई बहिणीचा उद्धार केला जातो. हे स्त्रियांना टार्गेट करणे थांबायला हवे. 

त्यामुळे असे काही पाठवतांना किंवा असे विनोद करतांना सद्सद्विवेक बुद्धीने विचार करायला हवा. लोकांनी आपल्या मेसेजला हसावे म्हणून आपण कुठल्या पातळीला जात आहोत? विनोद असावेत पण ते निखळ असावेत त्यातून कुठल्याही वर्गाचा अपमान होणार नाही हे तत्व आपण पाळायला हवे, सोशल मीडिया हे तंत्रज्ञान आपण चांगल्या पद्धतीने हाताळायला हवे आणि अशा फॉर्वर्डस संदेश टाळायला हव्यात असे मला वाटते. कारण हे मेसेज जेव्हा काश्मीरचे तरुण वाचतील तेव्हा त्यांच्या मनावर काय परिणाम होईल द्वेष निर्माण होईल की प्रेम? आपणच विचार करा आणि ठरवा.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News