पुरूषांनी केली वटपौर्णिमा साजरी; यंदाचे आठवे वर्ष 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019

जिल्ह्यात कुडाळ येथे गेली आठ वर्षे पुरूष मंडळी एकत्र येऊन अनोखी प्रथा जोपासत आहेत.महाराष्ट्रात महिला वटपौर्णिमा उत्साहात साजरी करत असतानाच कुडाळमध्ये मात्र पुरूष मंडळींनी वडाला सात फेऱ्या घालत वटपौर्णिमा अनोख्या रितीने साजरी केली. पुरूषांच्या या उपक्रमाचे यंदाचे आठवे वर्ष आहे.

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात कुडाळ येथे गेली आठ वर्षे पुरूष मंडळी एकत्र येऊन अनोखी प्रथा जोपासत आहेत.महाराष्ट्रात महिला वटपौर्णिमा उत्साहात साजरी करत असतानाच कुडाळमध्ये मात्र पुरूष मंडळींनी वडाला सात फेऱ्या घालत वटपौर्णिमा अनोख्या रितीने साजरी केली. पुरूषांच्या या उपक्रमाचे यंदाचे आठवे वर्ष आहे.

पुरुषांनी सकाळीच श्री देव गवळदेव मंदीर जवळील वटवृक्षाची पूजा करून या वृक्षाला सुताने गुंडाळून सात फेरे मारले. सुहासिनी महिलांप्रमाणेच जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी, तिला निरोगी दीर्घायुष्य मिळावे अशी भावना यावेळी पुरूष मंडळींनी व्यक्त केली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News