रद्दीचं ग्रंथालय

स्नेहल पवार, सातारा
Wednesday, 17 July 2019

खरंच मित्रानो कधी विचार केलाय का, की रद्दी सुध्दा एक सुंदर ग्रंथालय होऊ शकते... आपल्या दररोजच्या जीवनात खूप काही घडून जात अपेक्षीत अनपेक्षितपणे..

खरंच मित्रानो कधी विचार केलाय का, की रद्दी सुध्दा एक सुंदर ग्रंथालय होऊ शकते... आपल्या दररोजच्या जीवनात खूप काही घडून जात अपेक्षीत अनपेक्षितपणे... काही गोष्टी मनावर घेतल्या जातात तर काही रद्दी समान मानल्या जातात, पण कधी विचार केला तर असा वाटत ती रद्दी सुध्दा खूप महत्वाची ठरू शकते अगदी ग्रंथासारखी...

कोणताही पुस्तक वाचून झालं की आपण त्याच्या कडे पाहतही नाही, नकळत का होईना पण ती रद्दी आहे असा मानतो... पण ते पुस्तक रद्दी होण्याआधी त्याच्यातील ग्रंथरूपाने दिलेल्या गोड आठवणी त्यारद्दी कडे पहिल्यावरच येतात ना... पुस्तकांचेच काय घेऊन पडलाय, आपल्या दिवसाची छान सुरुवात करून देणारे अगदी चार पानी व्यक्तीमत्व असणारे वर्तमानपत्र काही कालावधी नंतर रद्दी होते...
        
कोणीतरी सोबत घालवलेले सुखाचे क्षण, काही गोड आठवणी, नवी सुरवात, कुणीतरी भरभरून दिलेला प्रेम, खट्टी मिठी मैत्री ह्या सर्व गोष्टी नविन आहेत तोपर्यंत त्यातील आठवणी खूप छान मनात विहार करत असतात.. पण का कोणास ठाऊक नियतीच्या खेळानुसार किंवा मनातील भावनांनुसार ते सार काही कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे नाहीशी होता.. अगदी शोध घेण्याआधी ते लुप्त होते... आणि उरते ती फक्त रद्दी.. आणि मग एक दिवस असा येतो जेंव्हा आपला कोणीही आपल्या जवळ नसत तेव्हा मग रद्दी अगदी प्रेमाने हाताळळी जाते.. आणि मग ती आठवणीची रद्दी ग्रंथालय होते...

काही भेटी छान आठवणी आणून देतात.. एक मैत्री समाधान देऊन जाते.. आणि आपण ज्याला आपलंस मानलं तो क्षणभर का होईना नसूनही असल्यासारखा भासतो.. आणि मग  काही दिवसांपूर्वी आठवणीची, वाचनाची, काही भेटीची जी रद्दी होती तीच एक सुंदर ग्रंथालय वाटू लागते... एकटेपणा दूर करणारे ग्रंथालय....

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News