पावसाळा सुरु झाला की, याची आठवण हमखास येणार..!

दिपाली बोडवे
Wednesday, 3 July 2019

 ​ये.. रे.. ये.. रे.. पावसा, तुला देतो पैसा

ये.. रे.. ये.. रे.. पावसा, तुला देतो पैसा, ही कविता सगळ्यांनाच माहिती असेल. पावसाळा म्हंटल की, मला आठवत ते माझे बालपण, आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आज मला पुन्हा लहानपणीच्या आठवणीत जगावेसे  वाटते. पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. 

लहानपण खरच छान असत. मला अजूनही आठवतात माझे शाळेतले दिवस. आपले तीन मुख्य ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा... पण सगळ्यात जास्त आवडतो तो पावसाळा, कधी पहिला पाऊस पडतोय याची आतुरता नेहमी असायची आणि कधी मी त्या पावसात भिजतेय अस व्हायचं. मला पण घरातले काय भिजून देत नहीत, पण घरी काय कारण देऊन पावसात भिजयला पळून जायचे हा मोठा प्रश्न मला तेव्हा पडायचा. 

पावसाळ्यात शाळेत जायची मजाच वेगळी असते. मला अजूनही आठवतय कितीही पाऊस असला तरी शाळेत तर जायचे. शाळेत जायचा दुसरा हेतू हा की पावसात भिजायला भेटत होत, म्हणूनचं तर मुद्दाम रेनकोट घरी विसरायचा आणि पावसात भिजायचं.

पाण्याच्या डबक्यात उडी मारायची एक मजा वेगळीच होती. भिजली की पप्पा ओरडायचे, पण लहानपणी कोणी कधी सुधारलं आहे का? पप्पा ओरडले असले तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा भिजायचं, याची मला सवयचं झाली होती.

पावसाच्या वाहत्या पाण्यात ते कागदी बोट बनवून सोडणे तसेच इतर गोष्टी करायला खूप मजा यायची. लहानपणीच्या त्या पावसाच्या आठवणी खरंच कधीही विसरता येत नाहीत आपण जसजसे मोठे होतो तश्या ह्या आठवणी अजून आठवत राहतात कारण गेलेलं बालपण परत कधीही येत नाही मात्र आठवणी कायम आठवत राहतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News