मेघना बोर्डीकरांनी जपली ‘'जलमैत्री''

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

▪२४ कोटी लीटर पाणीसाठ्यासाठी केली मोलाची मदत ▪

▪अनेक गावे होणार टंचाईमुक्त ▪

परभणी : राजकारणाबरोबरच समाजकार्यात सतत पुढाकार घेणारे व्यक्तीमत्व म्हणून मेघना बोर्डीकर यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आपले सामाजीक दायीत्व जपत त्यांनी अनेक गावांमध्ये जलक्रांतीच घडवून आणली आहे. फक्त कागदावर ‘जलमित्र’ न राहता खऱ्या अर्थाने जलमैत्री जपत त्यांनी अनेक गावांमध्ये श्रमदानासह मोठी आर्थिक मदतही केली. यातून पुर्ण झालेल्या कामांमुळे या गावातील जलसंकट दूर होण्यात मोलाची मदत होणार आहे.

यामुळे अनेक गावांमधील गावकरी बोर्डीकर यांच्या कामांबाबत समाधान व्यक्त करत आहेत. मेघना बोर्डीकर यांचे नाव जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असते. लोकसभा निवडणूकीत तर त्यांचे नाव राज्यभर चर्चेत आले होते. राजकारणावर पकड ठेवून असलेल्या मेघना बोर्डीकर सामाजीक विषयांमध्येही तेवढ्याच हिरीरिने सहभागी होत असतात. जिल्हाभरात शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, पर्यावरण, शेतकरी आत्महत्या आदि विषयांवर मेघना बोर्डीकर यांनी राबविलेल्या विविध ऊपक्रमांचे नागरिकांकडून ऊत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.

तर समाजभान असणारांनी त्यांचे वेळोवेळी कौतुक केले आहे.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्यभर राबवण्यात आलेल्या पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्तानेही मेघना बोर्डीकर यांनी आपले सामाजीक भान कायम राखत अनेक गावांमध्ये सहभाग नोंदवला. अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष श्रमदान करत बहुसंख्य गावांना त्यांनी आर्थीक मदत प्रदान केली. पाणी फाऊंडेशन व्यतिरिक्त दिपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सॅनी कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या दोन टूटेन मशीन वापरत, गावकऱ्यांच्या मदतीने २ कोटी ३३ लक्ष पाणी साठेल येवठे जल साठे तयार करण्यात आले आहेत. २० एप्रिल पासून सुरू झालेला हा श्रमदान यज्ञ पाऊस सुरू होई पर्यंत चालूच होता. 

यात मांडाखळी येथे ४ शिरपुर बंधाऱ्यांचे ८० हजार घनमीटर काम झाले त्यात ८ कोटी लिटर पाणी साचू शकेल. डासाळा (ता. सेलु) येथे ३६ घनमीटर चा एक बंधारा बांधण्यात आला. त्यात अंदाजे ३ कोटी ६० लाख लिटर पाणी साठेल. रिडज ( ता. जिंतुर ) येथे २५ हजार घनमीटरचे नाला खोलीकरण करण्यात आले त्यात २ कोटी ५० लक्ष लिटर पाणी जमेल. वस्सा ( ता. जिंतुर ) येथे ३ तळे तयार झाले त्यात ८९ हजार ७०० घनमीटर काम झाले त्यात ८ कोटी ९७ लक्ष लिटर पाणी साठू शकणार आहे. जांब खु ( ता. जिंतुर ) येथे ८ हजार घनमीटर काम झाले असून त्यात ८० लाख लिटर एवढा पाणीसाठा होणार आहे. 

या सर्व कामांमुळे २३ कोटी ७० लाख लिटर पाणी जमीनीत मुरणार आणि साठणार असून यामुळे वरील गावांवरील जलसंकट कायमचे दूर होण्यात मोलाची मदत होणार आहे. याच बरोबर जिंतुर तालुक्यांतील दगडचोप, वडाळी, ब्राम्हनगाव व गंगाखेड तालुक्यात आरबुजवाडी आदि गावांमध्ये बोर्डीकर यांनी  आर्थिक स्वरुपात मदत करत गावकऱ्यांना साथ दिली आहे. 

राजकारण तर सुरूच राहणार आहे. पण अशा प्रकारची सामाजीक कामे करताना आपल्याल एक वेगळे समाधान मिळत असते. म्हणूनच आगामी काळातही अशा प्रकारच्या सामाजीक ऊपक्रमांमध्ये भविष्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याचा मनोदय मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News