मेगाब्लॉक : उद्या पुन्हा एकदा तिन्ही मार्गांवर रेल्वेचा ब्लॉक !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019

मुंबई : उपनगरी रेल्वेवरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रुळांच्या देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे ‘अप’ जलद मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी व नेरूळ-खारकोपर आणि पश्‍चिम रेल्वेवर मरिन लाईन्स ते माहीम ‘डाऊन’ धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग 
कधी : सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत.
कुठे : कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील (अप) मार्गावर.
परिणाम : या स्थानकांदरम्यान ‘अप’ मार्गावरील जलद लोकल धीम्या मार्गावर. लोकल, मेल, एक्‍स्प्रेस गाड्यांना २० ते २५ मिनिटे विलंब.

हार्बर मार्ग
कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
कुठे : पनवेल ते वाशी आणि नेरूळ/बेलापूर ते खारकोपर दोन्ही दिशांकडील मार्गांवर.
परिणाम : पनवेल ते सीएसएमटी, वाशी ते पनवेल/बेलापूर, पनवेल ते अंधेरी लोकल सेवा बंद. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांकडील लोकल सेवा बंद. ठाणे ते वाशी/नेरूळ लोकल सेवा सुरू. बेलापूर ते खारकोपर दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा बंद. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल.

पश्‍चिम रेल्वे 
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत. 
कुठे : मरीन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ धीम्या मार्गावर.
परिणाम : ‘डाऊन’ धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर. या लोकलना महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा स्थानकांत थांबा नाही; लोअर परळ आणि माहीम स्थानकांत दोन वेळा थांबा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News