मुंबईकरांचे होणार 'मेगा'हाल,उद्या तिन्ही रेल्वेमार्गांवर 'मेगाब्लॉक'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

उपनगरी रेल्वेवरील तांत्रिक कामासाठी तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई :  उपनगरी रेल्वेवरील तांत्रिक कामासाठी तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान आणि पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

  •  कुठे : माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावर
  •  कधी : सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
  • परिणाम : या स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर. ठाण्यानंतर पुन्हा जलद मार्गावर. 

हार्बर मार्ग 

  • कुठे : कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ मार्गांवर.
  • कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
  • परिणाम : वाशी/बेलापूर/पनवेल-सीएसएमटी-वाशी/बेलापूर/पनवेल या ‘अप’ आणि ‘डाऊन’ मार्गांवरील लोकलसेवा बंद. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल या मार्गांवर विशेष लोकल.

पश्‍चिम रेल्वे

  • कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गांवर.
  • कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत.
  • परिणाम : जलद मार्गांवरील वाहतूक धीम्या मार्गावर.

आज रात्रकालीन ब्लॉक
पश्‍चिम रेल्वेवरील चर्चगेट-मरिन लाईन्स स्थानकांमधील पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान चारही मार्गांवर शनिवारी मध्यरात्री १ ते रविवारी पहाटे ४.३० या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे शनिवारी रात्री ११.५५ आणि मध्यरात्री १२.०५ वाजता विरारहून सुटणाऱ्या लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत चालवण्यात येतील.

त्याचप्रमाणे बोरिवलीहून मध्यरात्री १२.१८ वाजता सुटणारी लोकल १२.३० वाजता रवाना होईल. ही लोकलही मुंबई सेंट्रलपर्यंतच चालवण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News