सलग चौथ्या रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

मुंबई : उपनगरी रेल्वेवरील अनेक तांत्रिक कामांसाठी तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. २८) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने (अप) जलद मार्गावर, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांदरम्यान आणि पश्‍चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोडदरम्यान ब्लॉक घेतला जाईल. या कामामुळे अनेक लोकल रद्द होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे.

मध्य रेल्वे 
कुठे : कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान ‘अप’ जलद मार्गावर.
कधी : सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यत.
परिणाम : कल्याण ते ठाणेदरम्यान ‘अप’ जलद लोकल धीम्या मार्गावर. लोकल, मेल-एक्‍स्प्रेस २० ते २५ मिनिटे उशिराने.

हार्बर मार्ग 
कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ मार्गांवर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत.
परिणाम : वाशी-बेलापूर-पनवेल ते सीएसएमटी-वडाळा रोड, सीएसएमटी ते वाशी-बेलापूर-पनवेल व गोरेगाव-बांद्रा या स्थानकांदरम्यान वाहतूक बंद. कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल.

पश्‍चिम रेल्वे
कुठे : भाईंदर-वसई रोड स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ जलद मार्गांवर.
कधी : सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
परिणाम : या स्थानकांदरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News