निवडणुकांसंदर्भात जयंत पाटील आणि राज ठाकरे यांच्यात बैठक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे आमदार जयंत पाटील उपस्थित होते

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे आमदार जयंत पाटील उपस्थित होते.

दोन तास सुरू असलेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील समजू शकला नाही; मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. बैठकीत विरोधकांची महाआघाडी आणि ‘ईव्हीएम’ विरोध यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना-भाजपविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. महाआघाडीच्या माध्यमातून युतीला रोखण्याची रणनीती आखली जात आहे.

शिवाय, ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षाने घेतला असून बैठकीत त्यावर चर्चा झाल्याचे समजते. राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीत काय ठरले, हे लवकरच जाहीर करू, असे सांगत जयंत पाटील यांनी तपशील देण्यास नकार दिला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News