पुण्यात रंगला "माउली तुकारामांचा" गजर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

देहूतून प्रस्थान केलेल्या तुकाराम महाराज पालखीचे शहराच्या हद्दीत म्हणजे वाकडेवाडी येथे सायंकाळी सव्वापाच वाजता आगमन झाले.

पुणे - ‘ज्ञानेश्‍वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ असा जयघोष करीत लाखो वैष्णवांच्या साथीने पुण्यनगरीत बुधवारी दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे पुणेकरांनी प्रथेप्रमाणे दिमाखात स्वागत केले. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांची प्रचंड गर्दी आणि वारकऱ्यांच्या सहभागामुळे पुण्यनगरीने भक्तीचा महापूरच अनुभवला.

देहूतून प्रस्थान केलेल्या तुकाराम महाराज पालखीचे शहराच्या हद्दीत म्हणजे वाकडेवाडी येथे सायंकाळी सव्वापाच वाजता आगमन झाले. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. तेव्हाच ते वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करीत होते. पालखी येताच जागा मिळेल तेथून वाट काढत भविकांनी रथापर्यंत पोचून दर्शन केले. त्यानंतर पाटील इस्टेट परिसरात महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांच्यासह महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर फर्ग्युसन रस्तामार्गे पालखी विसाव्यासाठी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिराकडे मार्गस्थ झाली.

दिघीतून विश्रांतवाडीत दुपारी दाखल झालेली ज्ञानेश्‍वर महाराज यांची पालखी सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पाटील इस्टेट येथे पोचली. तेव्हा फुलांची उधळण आणि ज्ञानेश्‍वर माउलींचा जयघोष करीत भाविकांनी स्वागत केले. पाठोपाठ महापौर टिळक यांनीही पालखीचे स्वागत केले.

त्याआधी दुपारी ही पालखी शहराच्या हद्दीत विश्रांतवाडी येथे आली असता स्थानिक नागरिकांसह महापौरांनी तिचे स्वागत केले. वाकडेवाडीतून जंगली महाराज ररस्त्यावरील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातून गणेशखिंड रस्ता, त्यानंतर फर्ग्युसन रस्तामार्गे पालखी मुक्कामासाठी पालखी विठोबा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान फुर्ग्यसन रस्ता, डेक्कन, लक्ष्मी रस्ता परिसरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News