निसर्गरम्य माथेरान : एका वेगळ्या वाटेचा प्रवास !

सकाळ (यिनबझ)
Saturday, 10 August 2019

माथेरानमध्ये आपण कधी एका छुप्या आणि वेगळ्या वाटेने प्रवेश केला आहे का ? तीच वाट आपण आज जाणून घेणार आहोत.

माथेरान : पावसाळा म्हटलं, कि आपल्याला आठवतो आपल्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर. महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण तर निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरते. महाराष्ट्राला पुरातन काळापासूनच सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्टिकोनाचा वारसा लाभला आहे. शिवकालीन किल्ले, अफाट डोंगररांगा आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर अशी महाराष्ट्राची ओळख ! आणि याच ओळखीतले एक असे ठिकाण म्हणजे माथेरान ! आज वर्षाचे १२ हि महिने पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरान बद्दल आपण जाणून घेणार आहोत.परंतु एका वेगळ्या दृष्टीकोनातून.. 

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.

मलंग गडापासून ही डोंगर रांग सुरू होते. मलंग गडाला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.

अश्याच या माथेरानमध्ये आपण कधी एका छुप्या आणि वेगळ्या वाटेने प्रवेश केला आहे का ? तीच वाट आपण आज जाणून घेणार आहोत. हि वाट आहे पनवेलनजीकच्या धोधाणी गावापासूनच्या माथेरानमधील मंकी पॉईंटच्या ट्रेकिंग प्रवासाची. ट्रेकर्स साठी सोपी चढण असलेल्या ह्या वाटेवरून निसर्गाचा आनंद उचलून माथेरानपर्यंत अगदी अडीज तासात पायी पोचता येते. यूट्यूबवरील "THE ULTIMATE SQUAD" या चॅनेलने माथेरानच्या या वेगळ्या वाटेवरील प्रवासाचा एक व्हिडियो बनवला आहे. ज्यातून आपल्याला या माथेरानच्या वाटेची इत्यंभूत माहिती मिळते. 

https://www.youtube.com/watch?v=PNjxRlIDon0

तर तुम्ही कधी जाणार आहात या वेगळ्या वाटेवरून माथेरानच्या प्रवासाला?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News