या क्रिकेटपटूच्या हातून कानशिलात खाताच, पाकिस्तान क्रिकेटपटूची मॅच फिक्सिंगची कबुली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019
  • पाकिस्तान संघ २०११ साली इंग्लंड दौऱ्यावर असताना मॅच फिक्सिंगचा प्रकार समोर आला होता.
  • या प्रकरणी पाक संघातील सलमान बट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसीफ हे तिघे खेळाडू दोषी ठरले होते.

2011 साली इंग्लंड- पाकिस्ताचा सामना चालू असतांना सलमान बट जाणून बुजून बाद होत असल्याचे मला वाटत होते. मी आफ्रिदीलाही हा प्रकार सांगितला होता. त्यावेळी आफ्रिदीने मला सांगितले की, हा माझ्या मनातील गैरसमज आहे. त्यानंतर आफ्रिदीने मला खोलीतून बाहेर जायला सांगितले. मी खोलीबाहेर गेलो आणि दरवाजा बंद झाला. काही वेळाने मला कानशिलात लगावल्याचा आवाज आला. यानंतर आमीरने मॅच फिक्सिंगची कबुली दिली होती”, असे पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने जीएनएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमीरविषयीचा किस्सा सांगितला. यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.

“पीसीबीने त्यावेळी आयसीसीकडे जाण्याऐवजी तिन्ही खेळाडूंना पाकमध्ये परत पाठवले पाहिजे होते. यानंतर त्यांच्यावर एक वर्षांसाठी बंदी घातली पाहिजे होती. पण असं न करता पीसीबीने स्वत:ची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी आयसीसीकडे जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणामुळे जगभरात पाकिस्तानची प्रतिमा मलिन झाली”, असे रझाकने म्हटले आहे.
 
पाकिस्तान संघ २०११ साली इंग्लंड दौऱ्यावर असताना मॅच फिक्सिंगचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पाक संघातील सलमान बट, मोहम्मद आमीर आणि मोहम्मद आसीफ हे तिघे खेळाडू दोषी ठरले होते. मोहम्मद आमीर आता पुन्हा पाक संघात पुनर्गमन केले आहे. वर्ल्डकपमधील संघात त्याचा समावेश आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच विकेट्सही घेतल्या होत्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News