मराठी साहित्य आणि डिजीटल माध्यम

 राजेश पाटील, किनवट 
Wednesday, 27 February 2019

कवी राजेश बळीराम पाटील यांनी नुकतीच पत्रकारीतेतील एम. जे. एम. एस एस. ही पदव्युत्तर पदवी एम. जी. एम. महाविद्यालयातून पूर्ण केली आहे. सध्या मुक्त पत्रकारिता करतात. मासिक, साप्ताहिक, वर्तमान पत्रातून लेखन करतात. सामाजिक विषयावर अनेक कविता लिहतात. कवी संमेलन आपल्या बहारदार कविता सादर करत असतात.
            --- भ्र. ९७६७७७३३४०

जेंव्हा मूद्रणकलेचा शोध लागला नव्हता तेंव्हा  प्राचीन काळी लोक  झाडांची साल, ताम्रपट, शिलालेख,मूद्रा, यांचा वापर करून आपला संवाद साधत नंतर कागदाचा शोध लागला व भाषेचा विकास झाला लाकडाच्या टपाचा वापर होऊ लागला व नंतर आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले  

मराठी भाषा हि भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी एक असून जगातील पंधरावी व भारतातील तिसरी भाषा आहे मराठी बोलणार्‍यांची संख्या ९,००,००,००० एवढी आहे व ही भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे  महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, संत नामदेव, चक्रधर स्वामी, म्हांईभट,ते लो.टिळक ,साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे,व्यंकटेश माडगूळकर, केतकर,  कुसुमाग्रज, पूल.देशपांडे,प्रबोधनकार ठाकरे, ह.मो.मराठे,त्र्यंबक बापूजी ठोंबरे शिवाजी सावंत  अशा अनेक लेखकांनी आपले मराठी साहित्यात योगदान दिले आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञान डिजीटल युगातही मराठी भाषा साहित्य ई पूसतकाच्या स्वरूपात वाचल्या जाते.

१९९५ च्या सुमारास भारतात इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात होण्यास पहिल्यांदा सुरवात झाली  भारतीय लेखकाचे पहीले ई पुस्तक, पहीली कादंबरी, व पहीली मल्टीमिडीया कादंबरी ,धायवाईक काढण्याचा मान ए. बॅकंर यांना जातो डिजीटल प्रकाशनात अनेक प्रयोग केल्या गेले लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर करण्याची कोणतीही कसर पि.कोयलो यांनी सोडलेली नाही लेखिका कविता महाजन यांनी ओडीओ, व्हिडीओ ,कॅलिग्राफी, पेंटींग्ज ,फोटोग्राफ्स,अॅनिमेशन इत्यादींचा वापर करून ' कुहु 'ही  कादंबरी २०११ मध्ये प्रकाशित केली ती छापील व डीव्हीडी अशा स्वरूपात आता या माहिती यूगात नवे नवे प्रयोग होत आहेत  जपान मध्ये तर एका जपानी युवकाने 'डीप लव्ह' नावाची कादंबरी स्मार्टफोनद्वारे प्रकाशित केली इतकी लोकप्रिय झाली की तिच्या २७ लाख प्रती  विकल्या गेल्या नंतर त्याचे कॉमिक्स, टिव्ही ,मालिका, चित्रपट तयार करण्यात आले.

मराठीत बूक हंगामा डाॅट काॅम वर नूक्कड सारखे प्रयोग करण्यात आले तसेच फिरस्ती मध्ये लेखकांचे  प्रवास वर्णन लोकप्रिय आहे,व फेसबुकवर' न लिहीलेली पत्रे 'हे सदर महाराष्ट्रभर उदड प्रतिसादात चालले ऐकोणीस हजाराच्या वर सभासद झाले आज लोकराज्य, गृहशोभा,लोकसत्ता, मार्मिक, तनिष्का, धनूर्धारी,पुढारी, माहेर, मैत्रीण,सत्याग्रही ,चैतन्य,कवीकट्टा त्रैमासीक, अनेक पाक्षीक,ई वृत्तपत्र, अनेक ब्लॉग्स,अनेक मराठी साहित्या संबंधित वेबसाईट आज उपलब्ध आहेत जसे 

www.mayboli.com
lokrajya2011@gmail.com
tukaram.com
www. Yinbuzz.com
yinbuzz@gmail.com
esakal.com
mlokmat.com

अशा विविध मराठी  मासिक व मराठी दैनिक साहीत्या संबंधित उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग वाचक आज मोठय़ा प्रमाणात करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News