विदर्भातील मराठी आणि भाषेबद्दलचा निरर्थक न्यूनगंड

सत्यम रा. वानखडे
Sunday, 28 July 2019

रायलाच प्रश्न इंग्रजी, हिंदीच्या भरवशावर हुशाऱ्या मारणाऱ्या लोकांचा, तर इंग्रजी भाषेतच तैचे स्वतःचे बरेच शब्द नाही. 

जरी भाषा एक असली तरी ती क्षेत्रानुसार बदलते. अगदी पुण्यातली अन् विदर्भातील मराठी हा फरक सोडा हो, साधं अमरावतीमध्ये वेगळ्या पद्धतीची मराठी दिसेल. उदाहरण म्हणजे 'हमलपुऱ्याची आणि रुक्मिणी नगरकडली मराठी' यात थोडा फरक दिसेल असो...

आपल्याकडे आपले पालक मले-तुले, काय वं, वगैरे विदर्भातील मराठी बोलल्यास अधूनमधून टोकता, म्हणतात शुद्ध बोल. दुसरीकडे काही मंडळी अशीपण सापडतील. जी शुद्ध मराठीत (पुण्यकडल्या)बोलल्यास म्हणतील येल नको पाडू, इतरु नको, बाप्पा लैच हुशारी झाला नैत झाली, हिडगे, शिष्ट वगैरे विशेषणे लावून चांगल तोंडावर पाडतात.

विषय असा आहे की शुद्ध मराठी अथवा हिंदीतर विद्वानांतला विद्वान प्राध्यापक पण बोलत नसेल, कारण मूळ मराठी भाषेतच कितीतरी इंग्रजी, पोर्तुगीज, उर्दू, अरबी, फारशी, संस्कृत भाषेतले शब्द आहेत आणि आपण अगदी नकळत ते वापरतो. त्यात संस्कृत भाषेतुनच मराठी आणि सर्व भारतीय (खरेतर 80% युरोपियन, अरबी, वगैरे भाषापण बनल्या मानो या ना मानो) भाषा जन्मल्या  म्हणून आपण शुद्ध मराठी बोलतो, अस म्हणून येल पाडायचा कोनाले काही हक्क नाही. 

रायलाच प्रश्न इंग्रजी, हिंदीच्या भरवशावर हुशाऱ्या मारणाऱ्या लोकांचा, तर इंग्रजी भाषेतच तैचे स्वतःचे बरेच शब्द नाही. 

लॅटिन, ग्रीक, अरेमाईक आणि संस्कृततून घेतले आहे. या भाषेच्या ग्रामर आणि शुद्धतेवरपण कित्येक विद्वान प्रश्न उचलतात, ही भाषाच रद्दी मानतात. अन् ही किती गरीब भाषा एका शब्दले एकच अर्थ आपल्या संस्कृत, हिंदी, मराठीले बघा एका शब्दासाठी भरपुर शब्द.

अर्थ.. उदा सूर्य, आई, पत्नी साठी प्रचंड पर्यायी, समानार्थी शब्द दिसतील. अरे विदेशात तर कित्येक जागी इंग्रजी अक्षरशः लाथाडून लावली. फ्रांस, जर्मनी, चिनी, इस्त्राईल वगैरे देशात इंग्रजीत बोललो तर वाईट वागणुक देईल; पण जर्मनीत (मातृभाषा) बोललो तर मात्र भरपुर आदरातिथ्य करतील आणि तिथलं शिक्षणपण त्याचा भाषेतच आहे. जपानमध्ये जपानीतच मेडिकल, इंजिनिअरिंग आहे. असो।। 

मग आपल्यालेच कौन लाज वाटावी म्हणतो. आपली स्वदेशी मातृभाषा हीच श्रेष्ठ नाही का? आपण तर तिले पण क्षेत्राच्या आधारावर वेगळं केलं. विदर्भातील मराठी, पुण्यातील मराठी, वऱ्हाडी वगैरे अरे सोडा रे ही नकारात्मकता. 

हे आपल्या भाषेची श्रीमंती, मोठेपणा नाही का की इतक्या विविधतेने फुललेली आहे. आपली मायबोली मराठी. अन् दुसरी नवल गोष्ट म्हणजे आपणच नेहमी काही तरी नवीन म्हणी, शब्द, वाक्प्रचार, यांची भर या dictionary मध्ये दररोज पाडत असतो. 

नवीन नवीन शब्द निर्माण करत असतो. चला तर मग मनसोक्त, मुक्तछंद पणे वाटन त्या भाषेत कुठेही बोलत जाऊ. विचार मांडता येन महत्वाचं मग तो माणूस कसाही मांडो.  जगात प्रत्येक माणूस आपापल्या ठिकाणी कवी, लेखक, वक्ता, आहे. फक्त आपण त्याची गळचेपी करत असतो. अरे जर कसही आपलं मत मांडायचं स्वातंत्र्य दिल तर सर्वसामान्य माणसे वेगळी आणि वक्ते, लेखक असणारे वेगळे हा वरवरचा भ्रम दूर होईल.  असो स्वदेशी मायबोली मराठी बोलू, जगू, वाढवू आणि अभिमान बाळगू आपल्या वऱ्हाडी भाषेचा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News