...म्हणून मराठा संघटनांनी मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला जोडे मारले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 September 2019
  • राज्यातील गड, किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात येणार या निर्णयामुळे संतप्त मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.6) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला चपलाचे फटके मारून निषेध व्यक्‍त केला. 
औरंगाबाद: राज्यातील गड, किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याच्या निर्णयाविरोधात अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे संतप्त मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.6) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला चपलाचे फटके मारून निषेध व्यक्‍त केला. 

दरम्यान, एमटीडीसीने गड किल्ले भाडेत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सिडकोतील वसंतराव नाईक चौकात अखिल भारत छावा संघटनेनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी संघटनेचे अप्पासाहेब कुढेकर, अशोक मोरे, बाळासाहेब भुमे, सोमनाथ पवार, शुभम केरे, साहेबराव शिंदे, तेजस पवार, सौरभ सिरसाठ, सचिन पाटील, शुभम खैरनार, प्रतीक पाटील, राज कळसकर, किरण चौधरी उपस्थित होते. 

सिडकोतील कॅनॉट गार्डन परिसरात शिवक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, संदीप खांडेभराड, स्वाभिमानी छावाचे रमेश केरे, छावा मराठा संघटनाचे रवींद्र काळे यांनी मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला चपल मारून निषेध केला. पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर छावा श्रमिक संघटनचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

यावेळी नीलेश धस, लहुजी राठोड, महादेव प्रधान, नीलेश उजगरे, दगडू शिंगटे, ज्ञानेश्‍वर घारे, संदीप राठोड यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 
तसेच अ. भा. झुंजार छावाचे अध्यक्ष सुनील कोटकर, केंद्रीय कार्याध्यक्ष निलेश ढवळे यांनीही याबाबत पत्रक काढून निषेध व्यक्‍त केला. गडकिल्ले कुणाच्याही बापाची मालमत्ता नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे, भगवा झेंडा हाती घेत बेगडी प्रेम व्यक्‍त करायचे धंदे बंद करावेत, अशा शब्दांत संताप व्यक्‍त केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News