मराठा आरक्षण अध्यादेशाविरोधातील याचिकेवर गुरुवारी सुनावणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

वैद्यकीय व दंत वैद्यक अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने यंदापासूनच मराठा आरक्षण लागू केले. त्या निर्णयाला डॉ. प्रांजली चरडे व इतरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात एक प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे न्या. सुनील शुक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांनी प्रकरणावरील सुनावणी गुरुवापर्यंत तहकूब केली. 

नागपूर : वैद्यकीय व दंत वैद्यक अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने यंदापासूनच मराठा आरक्षण लागू केले. त्या निर्णयाला डॉ. प्रांजली चरडे व इतरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयात एक प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे न्या. सुनील शुक्रे आणि न्या. श्रीराम मोडक यांनी प्रकरणावरील सुनावणी गुरुवापर्यंत तहकूब केली. 

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा आदेश देऊन प्रवेश प्रक्रिया रद्द ठरवली. तो आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी सरकारविरुद्ध आंदोलनाला सुरुवात केली. 

वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात यंदापासून मराठा आरक्षण (एसईबीसी) लागू होणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यंदापासूनच आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावून अध्यादेश पारित केला. त्यानुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आता ‘एसईबीसी’ आरक्षण पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू झाले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News