हायकोर्टाचा मराठा विद्यार्थ्यांना दिलासा; यंदापासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण कोटा चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करु. नये,. अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई हायकोर्टने फेटाळली. त्यामुळे यंदाच्या वर्षी मराठा आरक्षण शिक्षण कोटा लागू झाला असून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण कोटा चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करु. नये,. अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई हायकोर्टने फेटाळली. त्यामुळे यंदाच्या वर्षी मराठा आरक्षण शिक्षण कोटा लागू झाला असून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अॅड मुकेश वशी यांच्या मार्फत याचिका केली होती. आरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार राज्य सरकार पुढील शैक्षणिक वर्षांपासून मराठा समाजाला सामाजिक आर्थिक मागास गटात आरक्षण द्यायला हवे, चालू वर्षी यावर जागा मंजूर करु नये, असा दावा वशी यांनी केला. मात्र प्रवेश प्रक्रिया मागील वर्षी ऑनलाईनवर सुरु झाली आहे, प्रवेश देतानाच आरक्षण लागू होते, असे सरकार च्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ विजय थोरात यांनी खंडपीठाला सांगितले. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य ठरविला. शिक्षण क्षेत्रात बारा टक्के आरक्षण देण्याचे आदेश हायकोर्ट ने यापूर्वी दिले आहेत. सरकारने सोळा टक्के जागा ठेवल्या होत्या.

दरम्यान, यावर्षीपासून वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण लागू करू नये. तसेच 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून ते लागू करण्यात यावे. यासाठी राज्य सरकारने एसईबीसी कायद्यातील सुधारणा अवैध ठरवण्याची मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयात राज्य सरकारकडून करण्यात आलेला दावा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीपासून वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली. प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी कायद्याला मंजुरी देण्यात आली. वैद्यकीय प्रवेशादरम्यान सुरू शैक्षणिक वर्षापासून एसईबीसी कायद्यानुसार प्रवेश दिला जाणार नसल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते, असे विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नमूद करण्यात आले होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News