‘मराठा मोर्चा’च्या समन्वयकांची उद्धव ठाकरेंशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपल्या मागण्यांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनमध्ये भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपल्या मागण्यांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनमध्ये भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.

क्रांती मोर्चाच्या मागण्यांवर उद्धव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या १३,७०० केसेस मागे घेण्यात आलेल्या नाहीत; तसेच कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या आरोपींनाही शिक्षा झाली नाही.  त्यामुळे प्रशासनाने उज्ज्वल निकम यांच्या ताकदीचा सरकारी वकील नेमून हा खटला अधिक सक्षमपणे लढवावा, अशी मराठा क्रांती मोर्चाची  प्रमुख  मागणी आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News