मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांचे आंदोलन पुन्हा पेटणार? प्रवेश टिकवण्यात सरकार अपयशी?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला. मात्र, सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकारच्या या भूमिकेविरोधात मराठा क्रांती मोर्चा आणि विद्यार्थी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 
यंदा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामध्ये मराठा आरक्षण रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

यामुळे मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्‍यात आले होते. विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित करावेत, यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. याची दखल घेत राज्य सरकारने अध्यादेश काढला. त्यानुसार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला; परंतु हे प्रवेश टिकविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत नसल्याचा आरोप केला. आरक्षणाबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना ही याचिका नागपूर न्यायालयात का जाते, असा सवाल उपस्थित केला आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News