आंदोलन स्थगित करत मराठा क्रांती मोर्चा पूरग्रस्तांच्या मदतीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019
 • आंदोलन स्थगित करीत पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचे केंद्र सुरू करीत असल्याचे समन्वयकांनी सांगितले.
 • आंदोलन स्थगित करीत पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचे केंद्र सुरू करीत असल्याचे समन्वयकांनी सांगितले.​

औरंगाबाद : मराठा क्रांतीची सुरवात होऊन तीन वर्षे झाली. राज्यभर आंदोलने झाली तरी, यातील बहुतांश मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. मदतीची आश्‍वासने हवेतच असल्याने मराठा क्रांती मोर्चातर्फे शुक्रवारी (ता. 9) विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्‍तांना निवेदन देताना आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगलीची पूरपरिस्थिती लक्षात घेता, आंदोलन स्थगित करीत पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्याचे केंद्र सुरू करीत असल्याचे समन्वयकांनी सांगितले.
 
धरणे आंदोलन केल्यानंतर विभागीय आयुक्‍त कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी निवेदन दिले. यावेळी अभिजित देशमुख, किशोर चव्हाण, सुरेश वाकडे, विजय काकडे, रमेश गायकवाड, सतीश वेताळ, मनोज गायके, रेखा वहाटुळे, प्रदीप हारदे, शिवाजी जगताप, ज्ञानेश्‍वर अंभोरे, सखाराम काळे, बाबासाहेब दाभाडे, अजय गंदे, गिरीष झाल्टे, योगेश औताडे, रवी तांगडे, विलास जाधव, अंकत चव्हाण, वैभव बोडखे, रवी बोचरे, पवन खडके, रेणुका सोमवंशी सुकन्या भोसले आदींची उपस्थिती होती. 

अशा आहेत मागण्या 

 • कोपर्डी घटनेतील आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची पुढील कारवाई करावी. 
 • सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यासाठी तज्ज्ञ विधिज्ञांची मदत घ्यावी. 
 • ऍट्रॉसिटीचा गैरवापर थांबावा, यासाठीची दुरुस्ती, कायदेशीर निर्णय घ्यावेत.
 • शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्‍ती आणि हमीभाव द्यावा. 
 • प्रकल्पासाठी शेतजमीन संपादित करताना शेतकऱ्याला जमीन शिल्लक राहावी. 
 • मराठा असा शब्द असलेल्यांनादेखील जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना कराव्यात. 
 • मराठा, एसईबीसी प्रवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा अन्याय थांबवावा.
 • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे. 
 • सारथी संस्था त्वरित सुरू करावी. तसेच प्रशासकीय, तांत्रिक बळ पुरवावे. 
 • छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासोबत गडकिल्ले संवर्धन करावे. 
 • प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी शासकीय जमीन द्यावी. 
 • पाचशे मराठा विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहाचा प्रश्‍न मार्गी लावावा. 
 • ईबीसी सवलतीच्या अटींमध्ये दुरुस्ती आणि विस्तार करण्यात यावा. 
 • महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वासियांची भावना लक्षात घेऊन तो प्रश्‍न सोडवावा. 
 • मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण, महामानवांची बदनामी थांबवण्यासाठी कडक कायदा करावा. 
 • आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांच्या नातेवाइकांना जाहीर केल्याप्रमाणे दहा लाखाची मदत द्यावी. 
 • आंदोलनादरम्यान, मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. 
   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News