मराठा क्रांती मोर्चाची लवकरच पुढील दिशा ठरणार

राजेभाऊ मोगल
Saturday, 29 June 2019

औरंगाबाद : समाजबांधवांनी दिलेल्या दीर्घ लढ्यानंतर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण वैध असल्याचा निर्णय गुरुवारी (ता. 27) उच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, 16  टक्‍क्‍यांवरून शिक्षणात 12 आणि नोकऱ्यांत 13 टक्केच आरक्षण देत घट केली आहे. त्यामुळे 16 टक्के आरक्षण कसे मिळवता येईल, लढ्याची पुढील दिशा कशी असावी, यासाठी विविध मराठा संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ७ जुलैला राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. 

याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (ता. 28) सिंचन भवन येथे प्राथमिक बैठक पार पडली. सर्वार्थाने येथूनच सर्व सूत्रे हलली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पुढील दिशा ठरविण्यासाठी येथेच राज्यव्यापी चिंतन बैठक व्हावी, असा निर्णय घेण्यात आला.

यावेळी राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, सतीश वेताळ, सुनील कोटकर, नीलेश डव्हळे, प्रकाश हेंडगे, राजेंद्र जऱ्हाड, सतीश जगताप, शिवाजी जगताप, रवींद्र वाहटुळे, रेखा वाहटुळे, आत्माराम शिंदे, प्रदीप नवले, अजय गंडे, विक्‍की पाटील, अशोक खानापुरे, कृष्णा अडगळ, प्रदीप हारदे, मनोज गायके, सुरेश वाकडे, नितीन कदम, योगेश केवारे, सुकन्या भोसले, कुणाल पंढरे, अनिल जाधव उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News