मराठा कार्यकर्त्यांचा निर्धार ! आधी न्यायालयातून आरक्षण मिळवणार, आणि मगचं निवडणूक लढवणार..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

"मी न्यायालयीन, सामाजिक लढाई ही कुठलाही राजकीय विचार डोळ्यांसमोर ठेवून केलेली नव्हती. मतदारांच्या आशीर्वादाने आम्ही निवडणुकीत शंभर टक्के विजयी होऊ शकतो. पण, इतरांप्रमाणे मी राजकारणात प्रवेश केल्यास माझ्याकडून न्यायालयीन प्रकरणाकडे दुर्लक्ष होऊ शकते."

- विनोद पाटील, याचिकाकर्ते

नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही, असे आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

पाटील म्हणाले की, औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार नाही, हे जाहीर केले आहे. यापूर्वी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठलीही निवडणूक लढणार नाही, असे स्पष्ट केले. सुदैवाने मराठा आरक्षण मिळाले. उच्च न्यायालयात आरक्षणाची लढाई जिंकली, तरीही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल कायद्यानुसार आपल्या बाजूने लागेल, हा मला विश्‍वास आहे. 

मागील अनेक दिवसांपासून मी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार, अशी चर्चा केली जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News