माण तालुका शिक्षक प्रतिष्ठानचा पुढाकार; 20 हजारांची रोख मदत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

सातारा : दहावीत उज्ज्वल यश मिळविल्यानंतरही वडील अपघातात गंभीर जखमी झाल्याने बिदाल येथील मयुरी श्रीपती बोराटे हिच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने माण तालुका शिक्षक प्रतिष्ठानने तिच्या पुढील शिक्षणासाठी रोख 20 हजार रुपयांची मदत केली.
 
मयुरीला दहावी परीक्षेत 98.66 टक्के गुण मिळाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत असताना नायगाव (ता. खंडाळा) येथील कौतुक सोहळा आटोपून आपल्या वडिलांसोबत घरी परतत असताना सुरवडीनजीक त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात वडील गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ते एका खासगी शिक्षण संस्थेत लेखनिक असून, त्यांच्या कुटुंबाबर आर्थिक संकट कोसळले असताना माण तालुका शिक्षक प्रतिष्ठानने तिला मदतीचा हात दिला. माण शिक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, प्रशांत जगताप, लोखंडे, रवी परमाळे, सुभाष गोंजारी, शैलेंद्र साळुंखे, अरविंद आघाव, अमोल निकम यांच्यासह माण शिक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मयुरीकडे रोख 20 हजार रुपयांची मदत सुपूर्द केली. या वेळी तिचे कुटुंबीय उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News