मंगेश देसाई कर्तव्यदक्ष पोलिसाच्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

‘लाल बत्ती’ या चित्रपटात अभिनेता मंगेश देसाई कर्तव्यदक्ष पोलिसाच्या भूमिकेत आहे. ‘कारगील विजय दिवस’ म्हणजे २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

अभिनेता मंगेश देसाई आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘जजमेंट’ चित्रपटही प्रदर्शित झाला. आता मंगेशच्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा झाली आहे.

‘लाल बत्ती’ या चित्रपटात तो कर्तव्यदक्ष पोलिसाच्या भूमिकेत आहे. या भूमिकेबाबत मंगेश म्हणतो, ‘मी या चित्रपटासाठी खास ट्रेनिंग घेत पोलिसांचं काम आणि त्यांच्या बऱ्याच गोष्टी शिकून आत्मसात केल्या.’

गिरीश मोहिते दिग्दर्शित संतोष सोनावडेकर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. मंगेशबरोबरच भार्गवी चिरमुले, रमेश वाणी, मीरा जोशी आदी कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

‘कारगील विजय दिवस’ म्हणजे २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News