ऐनवेळी पोटाने धोका दिला: पादण्याचा आवाज आल्याने पोलिसांपासून लपलेला चोर सापडला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

तुम्हाला ही बातमी वाचून हसू आवरणार नाही. चोर चोरी करताना कितीही डोके वापरले असले तरी एखादी चूक त्याला महागात पडू शकते. पण अमेरिकेत एका चोराला त्याच्या पोटाने धोका दिल्याने पोलिसांच्या हाती लागला आहे. एक चोर पोलिसांपासून लपलेला असताना अचानक त्याच्या पोटाने दगा दिला अन् पादण्याचा आवाज आला आणि पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागला.

लिबर्टी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरामधील एका व्यक्तीविरोधात अटक वॉरंट जारी झाले. चोरी आणि बंदी असणारे पदार्थ बाळगल्याप्रकरणी हे अटक वॉरंट जारी झाले होते. तो मागील अनेक दिवसांपासून पोलिसांपासून लपत होता. मात्र नुकतेच पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी तो राहत असलेल्या परिसरात गेले असता तो जागेवर नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अमेरिकेमध्ये चोराच्या शरीराच्या वासावरुन त्याला पकडण्यासाठी के-९ या यंत्राचा वापर केला जातो. मात्र मिसूरी येथील पोलीस खात्याला एका चोराला शोधताना या यंत्राची गरजच पडली नाही. 

पोलिसांनी घराच्या आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेत असताना आधीच लपून बसलेल्या या व्यक्तीच्या बुद्धीने त्याला साथ दिली मात्र शरीराने मौक्याच्या क्षणी पोटाने धोका दिला. पोलीस शोध घेत असतानाच पोटातून आवाज येऊ लागले अन् हा व्यक्ती जोरात पादला. त्यामुळे इतका मोठा आवाज झाला की पोलिसांना तो कुठे लपून बसला आहे हे लगेच समजले अन् त्याला अटक करण्यात आली. मिसूरी पोलिसांनी याबाबत स्वत:च्या फेसबुक पेजवरुन माहिती दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News