व्हायरल व्हिडिओ : तरूणानं दारूच्या नशेत चक्क ऑन ड्यूटी पोलीस अधिकाऱ्याला केले 'किस'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

पोलीस अधिकाऱ्याला किस करण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हैदराबादमध्ये बोनालू फेस्टिव्हल सुरू होता. या महोत्सवादरम्यान २८ वर्षाच्या एका तरूणानं दारूच्या नशेत असताना चक्क ऑन ड्यूटी पोलीस अधिकाऱ्याची किस केलं आहे.

मुंबई : पोलीस अधिकाऱ्याला किस करण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हैदराबादमध्ये बोनालू फेस्टिव्हल सुरू होता. या महोत्सवादरम्यान २८ वर्षाच्या एका तरूणानं दारूच्या नशेत असताना चक्क ऑन ड्यूटी पोलीस अधिकाऱ्याची किस केलं आहे. ही घटना रविवारी २८ जुलैला घडली असून एका पोलीस अधिकाऱ्याला किस केल्याच्या आरोपाखाली एका तरूणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. 

वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण एक ग्रुप बनवून नाचत आहेत आणि त्याचवेळी अचानक त्यातील एक तरूण एका पोलीस अधिकाऱ्याला आलिंगन देतो आणि त्याला किसही करतो. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यानं तरूणाला धक्का देऊन बाजूला काढत त्याच्या सणसणीत कानशीलात लगावल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.

चौकशीनुसार आरोपी एका खाजगी बँकेमध्ये काम करत आहे. नल्लाकुंताला पोलीस स्टेशनचे इंस्पेक्टर मुरलीधर यांनी सांगितलं की, त्यांनी आईपीसी कलम ३५३च्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला आता ताब्यात घेण्यात आलं आहे.

‘बोनालू’ हैदराबादमधील एक हिंदू फेस्टिवल आहे जो दरवर्षी तेलंगाणामध्ये साजरा केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये अनेकजण सहभागी होतात.  फेस्टिव्हल २८ जुलै आणि २९ जुलै असा दोन दिवस साजरा करण्यात आला.<

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News