ममता दिदींचा 'राज,बाणा'; म्हणतात, 'बंगाली आलीच पाहिजे'..!

सकाळ (यिनबझ)
Saturday, 15 June 2019

ज्या कोणाला आमच्या राज्यात राहायच असेल तर, त्यांना आमची बंगाली भाषा बोलता आलीच पाहिजे

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राज ठाकरेंचा नारा हाती घेतलाय. बंगालमध्ये राहायच असेल तर बंगाली आलीच पाहिजे नाहीतर राज्यात राहु दिलं जाणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत ममता यांनी देखील भाषेचा राज,बाणा हाती घेतलाय.

भारतीय जनता पक्षाला टार्गेट करत, ज्या कोणाला आमच्या राज्यात राहायच असेल तर, त्यांना आमची बंगाली भाषा बोलता आलीच पाहिजे असं वक्तव्य केले आहे. तसेच, आपल्याला बंगाली भाषेला पुढे आणले पाहिजे. जेव्हा मी बिहार , युपी किंवा पंजाबमध्ये जाते तेव्हा तेथील भाषा बोलते. जर तुम्ही बंगालमध्ये राहत असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे. अशा गुन्हेगारांना राज्यात थाराच देणार नाही, जे बंगालमध्ये राहतात आणि बाईक वर इकडे तिकडे फिरतात, अस वक्तव्य करत ममतांनी भाजपवर जोरदार टिका केली.

 
डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. यावरुन ममता बॅनर्जींवर विरोधी पक्षातील नेत्यांनी हल्ला चढवलाय. यामुळे ममता यांनी भाषीक मुद्दा उचलुन घेत बंगालला गुजरात बनू देणार नाही. डॉक्टरांना भारतीय जनता पक्ष भडकवत असल्याच घणाघाती आरोपही ममता यांनी भाजपवर लगावला आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News