मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, प्रज्ञासिंह यांच्या अडचणींत वाढ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • मालेगाव बॉम्बस्फोटाच्या दिवशी हीच बाईक वापरण्यात आली
  • साक्षीदाराने प्रज्ञासिंह यांची मोटरसायकल ओळखली

मुंबई : आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मालेगाव बॉम्बस्फोटात वापरलेली मोटरसायकल सोमवारी विशेष न्यायालयात आलेल्या साक्षीदाराने ओळखली. न्या. विनोद पडळकर यांनी न्यायालयाच्या आवारात जाऊन या मोटरसायकलची पाहणी केली. त्यामुळे प्रज्ञासिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या दिवशी हीच बाईक वापरण्यात आली होती, असे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितले. न्यायालयाच्या आवारात एका टेम्पोत ही मोटारसायकल ठेवली आहे. न्या. पडळकर यांनीही टेम्पोत जाऊन या दुचाकीची पाहणी केली. पुरावे म्हणून या टेम्पोत काही सायकलीही ठेवण्यात आल्या आहेत. एलएमएल या कंपनीच्या मोटरसायकलवर फ्रीडम असे लिहिलेले आहे. बाईकचा पुढील भाग ठीक असून, मागील भाग खराब झाला आहे. सायकलींची दुरवस्था झाली आहे.

मोबाईल टॉर्चचा वापर करून पाहणी करत असताना न्या. पडळकर यांच्या कपड्यांवरही ग्रीसचे डाग पडल्याचे दिसले. या वेळी न्यायालयाच्या आवारात न्यायाधीशांसह कर्मचारी आणि वकील उपस्थित होते.

मालेगाव बॉम्बस्फोटात प्रज्ञासिंह यांची मोटरसायकल वापरल्याचा आरोप आहे. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार आणि १०० हून अधिक गंभीर जखमी झाले होते. उच्च न्यायालयात आरोपी समीर कुलकर्णी व अन्य काही आरोपींनी दोषमुक्ततेसाठी याचिका केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News