'हे' गाणे शूट करताना मलायका अरोराच्या कंबरेतून रक्तस्राव सुरु होता 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

या गाण्यावर डान्स करताना मलायकाला गंभीर दुखापत झाली आणि तिच्या शरीरातून रक्त येऊ लागलं होतं. हे सर्व पाहून सेटवर गोंधळ उडाला होता.

 

मुंबई: वयाच्या 45व्या वर्षीही बॉलिवूडची आयटम गर्ल मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. मलायका तेवढी मेहनतही करते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मलायकानं तिच्या शाहरुख सोबत शूट केलेल्या 'चल छैयां-छैयां' या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव सांगितला. या गाण्यावर डान्स करताना मलायकाला गंभीर दुखापत झाली आणि तिच्या शरीरातून रक्त येऊ लागलं होतं. हे सर्व पाहून सेटवर गोंधळ उडाला होता.

१९९८ मध्ये म्हणजेच मलायकाच्या करिअरची सुरवात होती. शाहरुख खानचा  'दिल से' या चित्रपटात  पहिलं आयटम साँग केलं होतं. ज्यामुळे तिची ओळख सर्वत्र झाली होती. ते गाणं होतं 'चल छैयां-छैयां' ज्यामध्ये मलायकानं शाहरुखसोबत चालत्या ट्रेनवर उभं राहून शूट केलं होतं. त्यानंतर आयटम गर्ल म्हणून तिची ओळख झाली होती, त्यासोबतच दबंग, हाऊसफुल्ल यासारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये आपल्या आयटम साँगमुळे चर्चेत राहिलेल्या मलायकानं आता पर्यंत अनेक सुपरहीट आयटम साँग दिली आहेत. 

'चल छैयां-छैयां' या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव शेअर करताना मलायका म्हणाली, या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मी अनेकदा पडले होते. चालती ट्रेन, जोराचा वारा आणि ट्रेनवर उभं असताना मला सतत डाव्या आणि उजव्या बाजूला झुकून संतुलन ठेवायचं होतं. अशात घागरा घालून डान्स करणं माझ्यासाठी खूप कठीण जात होतं. त्यावर उपाय म्हणून माझ्या घागऱ्याला कमरेत दोरी बांधण्यात आली.

मलायका पुढे म्हणाली, 'कमरेत दोरी बांधून मी शूट सुरू ठेवलं. पण जेव्हा ती दोरी सोडण्यात आली त्यावेळी त्याच्यामुळे माझ्या कमरेवर त्याच्यामुळे कट आले होते. ज्यामुळे त्यातून रक्तही येऊ लागलं होतं. हे पाहिल्यावर संपूर्ण टीम घाबरली होती.'

आजही हे गाणं मलायकाच्या सिने करिअरमधील सर्वात लोपकप्रिय गाणं म्हणून ओळखलं जातं. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खाननं केली होती. तर हे गाणं चालत्या ट्रेनवर शूट करण्याची संकल्पना दिग्दर्शक मणिरत्न यांची होती. मलायकाची मेहनत कामी आली आणि गुलजार यांनी लिहिलेलं आणि ए. आर. रेहमान यांचं संगीत असलेलं हे गाणं जेव्हा रिलीज झालं त्यावेळी ते खूप जास्त लोकप्रिय ठरलं. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News