उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करा,‘मातोश्री’ परिसरात पोस्टरबाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 10 November 2019

मुंबई : सध्या भाजप-सेनेमध्ये मुख्यमंत्री आमचाच यावरून वाद सुरु आहे. हा वाद सध्या टोकाला पोहचला आहे. शिवसेनेकडून तर पोस्टरबाजी सुरु आहे. शिवसैनिकांनी सुरवातीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला होता, आता शिवसैनिकांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. ‘मातोश्री’ परिसरात पोस्टरबाजी करुन शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपदावर विराजमान करण्याचा जोर धरला आहे.

मुंबई : सध्या भाजप-सेनेमध्ये मुख्यमंत्री आमचाच यावरून वाद सुरु आहे. हा वाद सध्या टोकाला पोहचला आहे. शिवसेनेकडून तर पोस्टरबाजी सुरु आहे. शिवसैनिकांनी सुरवातीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला होता, आता शिवसैनिकांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. ‘मातोश्री’ परिसरात पोस्टरबाजी करुन शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रिपदावर विराजमान करण्याचा जोर धरला आहे.

aकाय पोस्टरवर?शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरेमुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे–आपला नम्रशिवसैनिक

शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. परंतु शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी वारंवार होते. त्याचप्रमाणे गटनेतेपदी निवडलेले गेलेले एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याही नावाची चर्चा होताना दिसते.देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल चढवला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांचाही संताप पाहायला मिळाला.‘चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यासाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं. ते मी पूर्ण करणार.

दरम्यान, त्याच्यासाठी भाजप, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही.’असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. ‘शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. फडणवीस यांनी आत्ता जाहीर करु नका, वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असं म्हटलं. तसेच आत्ता सांगितलं तर पक्षात माझी अडचण होईल असं नमूद केलं होतं. ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला.’ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला होता. ते म्हणाले हाेते, मी खोटारडा म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. जमत नाही असं म्हटलं तर एकवेळ ठीक आहे. पण ठरलंच नाही, हा आरोप मी सहन करणार नाही. खोटं बोलण्याचा हिशोब काढला तर अच्छे दिन, नोटबंदीपासून कोण खोटं बोललं हे दिसेल, असा संतापही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला होता. संजय राऊत देखील रोज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधत आहेत. यावरून भाजप-सेना युती तुटण्याच्या मार्गावर आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News