कणकेचा उत्तप्पा असा बनवा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

कणकेचा उत्तप्पा सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या हलक्या जेवणाला उत्तम पदार्थ आहे. खूप सोपा, घरी जे असते, त्यातूनच बनवता येतो. नक्की करून बघा 

काय घ्याल
1 1/ 2 वाट्या कणीक, 
1/4 वाटी बेसन, 
1/2 वाटी बारिक रवा 
1/2 वाटी ताक (आंबट नको), 
1/2 वाटी बारिक चिरलेला कांदा, 
1/4 वाटी बारिक चिरलेली कोथीम्बीर, 
1/2 वाटी कुठलीही कोरडी चटणी (दाण्याची किंवा खोबरे लसूण) 
3/4 टी स्पून मीठ, 
1/2टी स्पून तिखट (हवे असल्यास)

कसे कराल
कणीक, रवा, बेसन, मीठ, तिखट, ताक सगळे एकत्र करून हवे आसल्यास थोडे पाणी घालून सरसरीत भिजवून ठेवावे, 1 तासाने नॉनस्टिक तव्यावर उत्तप्पा घाला त्यावर कोरडी चटणी, कांदा, कोथीम्बीर घाला, थोडे तेल सोडा, कडेने जरा ब्राउन झाला की, उलटा टाका लगेच काढून सर्व करा. थोडे बटर किंवा लोणचे दिल्यास आणखीनच छान. रात्रीचे जेवण असल्यास छानसं सूप द्या.

उत्तप्पा बरोबर महत्वाचे 
कमीत कमी 1 तास ठेवावे, ज्यास्त वेळ ठेवल्यास छान फूगतो, 
उत्तप्पा 2ते 3/4 तासांनी मात्रा जास्त आम्बूस लागतो. आवडत असेल तर बारिक चिरलेला टोमटो, हिरवी मिरची घाला. मग तिखट घालू नका.
ह्या प्रमाणे 6/7 ऊत्तपे होतात.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News