मैत्री ही लगोरीसारखी कधी विसकटणारी तर कधी जुळणारी

साक्षी साळुंखे
Tuesday, 11 June 2019

आता मात्र लग्न झाली; सगळ्या संसारात पडल्या. भेटणं काय? फोन काय? एखादा मेसेज पण खूप मुश्किलीने टाकला जातो. ज्या मैत्रिणी थोडे दिवस फोन केला नाही म्हणून हक्काने जाब विचारणाऱ्या आता मात्र असंच कुणाचा ग्रुप दिसला की आम्हीही अशीच मस्ती केली असं सांगत असतो. मुलांच काय हो त्यांच्या मैत्रीत कधी खंड नाही म्हणजे त्यांना काय लग्न झालं तरी ते संपर्कात असतात.

त्या दिवशी सहजच कुटुंबासोबत चौपाटीवर जाणं झालं, तेव्हा एका मुलींच्या गु्पकडे माझं लक्ष गेलं तर या अगदी छान, मस्त सेल्फी काढत, खात-पित एकमेकींमध्येच छान रंगुन गेल्या होत्या.. खुप चर्चा , इकडचां-तिकडचां  विषय, सर्व काही झकास चाललं होतं त्यांच. त्यांचा ग्रुप पाहून मला एक विचार आला  की आम्हीही अशीच मस्ती, मज्जा केली, टिंगल- टवाळी केली. कधी कधी तर मालिकेवरुन चर्चा, कधी कधी शाळेत असताना शिक्षकांना त्रास वगैरे गोष्टी सुद्धा केल्या. खूप मज्जा आली, खूप धमाल केली.

आता मात्र लग्न झाली; सगळ्या संसारात पडल्या. भेटणं काय? फोन काय? एखादा मेसेज पण खूप मुश्किलीने टाकला जातो. ज्या मैत्रिणी थोडे दिवस फोन केला नाही म्हणून हक्काने जाब विचारणाऱ्या आता मात्र असंच कुणाचा ग्रुप दिसला की आम्हीही अशीच मस्ती केली असं सांगत असतो. मुलांच काय हो त्यांच्या मैत्रीत कधी खंड नाही म्हणजे त्यांना काय लग्न झालं तरी ते संपर्कात असतात पण आम्ही म्हणजे, आम्हीच नाही आमच्यासारख्या कितीतरी स्त्रिया ज्यांना आपण बघतो, त्या सांगताना पण असंच सांगतात आम्हीही अशीच मस्ती केली आणि आता मात्र एखादा फोन आला तरी बरं वाटतं.

लगोरी  खेळण्यापासून एकत्र असलेल्या आम्ही कॉलेज मध्ये तर खूप जवळ आलो. लहान गोष्टींवरून भांडणे करून मोठा अबोला धरणाऱ्या आम्ही, कधी कुणाचा ब्रेकअप झाला तर, अगदी छातीठोकपणे सांगत होतो की चल सोड गं तो तुझ्यासाठी नव्हताच. एवढ्या जवळच्या पण; आता मात्र संसार नावाचा एक चेंडू येऊन सहज आमचा खेळ म्हणजेच मैत्रीत अंतर पाडून जातो असं वाटताना वाटत असेलही सर्वांना; पण एक खरंखुरं सत्य आहे या पाठी आम्ही मैत्री करताना कधी दाखवण्यासाठी केली नाही. आम्ही मैत्री केली एकमेकींच्या मनांशी-स्वभावांशी म्हणजे मैत्री दिसली नाही तरी ती जाणवली नक्कीच पाहिजे. 

रोज भेटावं, बोलावं, हे काही गरजेचं नसतं बरं का हा. आता  तेवढा खेद वाटतो की आमचं भेटणं होत नाही सारखं  पण असं नाही ना की कधीच भेटणार नाही. कधी कधी असं वाटतं "रफी" साहेब त्यांच्या गाण्यात म्हणतात जसं "खो गयी यारों की मैफिल, हो गयी तन्हायियां" पण ते त्या वेळेपुरतं, कारण आम्ही पुन्हा भेटलो की परत तीच मस्ती आणि तेच दिवस पुन्हा नव्याने जगत असतो. आणि आता तर सोशल मीडिया मुळे सोप्पं झालंय सगळं.

लगोरी हा खेळ जसा आहे, वाटतो तसा त्यापाठी एक सत्य देखील आहे,  जसं तो चेंडू लावलेल्या त्या लगोरीला विस्कटून जातो पण तोच खेळ परत त्याच जोशाने, त्याच आनंदात परत लावला जातो. कारण; मुलींची मैत्री ही याच विश्वासावर टिकलेली असते की परत ती लगोरी मांडली जाणार, आणि आपण परत एकत्र येणार. म्हणजेच 'लगोरी' एक न दिसणारा कट्टा आहे कारण या कट्ट्यावर जशी दाखवली जाते तर यापेक्षाही पलीकडे ती एकमेकींच्या मनांच्या कोपऱ्यात जाऊन जागा करून आलेली असते. आणि ती जागा त्यांच्या पासून हिरावू शकत नाही. त्या जागेला कशाचीही फरक पडत नाही. ना अंतराचा, ना व्यस्थ जीवनाचा, कारण ती जागा कायमस्वरूपी आहे अशीच असते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News