मैथिलीची गोळाफेकीत भरारी 

गजेंद्र बडे
Saturday, 26 January 2019

खेळामध्ये एका खेळाडूला विजय व दुसऱ्या खेळाडूला पराजय पचवावा लागतो. मैदानी स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी मनाचा विजय महत्त्वाचा असतो. शेळगाव (ता. इंदापूर) येथून ग्रामीण भागातील मैथिली अंबादास शिंगाडे (वय 18) हिने गोळा व हातोडाफेक स्पर्धेमध्ये तीन वेळा राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. मैथिलीचे माध्यमिक शिक्षण शेळगाव गावातील रयत शिक्षण संस्थेच्या संत मुक्ताबाई विद्यालयामध्ये झाले.

सुरवातीपासून मैदानी स्पर्धेची आवड होती. खो-खो व कबड्डीची तिला आवड होती. मात्र, सांघिक स्पर्धेमध्ये शाळेतील इतर मुलींची साथ मिळत नसल्याने तिने आठवीपासून वैयक्तिक गोळा, थाळी व हातोडाफेक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास सुरवात केली. मैथिलीला नववीमध्ये असतानाच गोळाफेक स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळवून विभागीय पातळीवरील स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. विभागीय पातळीवरील स्पर्धेमध्ये तिसरा क्रम्रांक पटकावला होता.

दहावीमध्ये शिक्षण घेत असताना गोळा व हातोडाफेक स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय पातळीवरील स्पर्धेमध्ये मजल मारत, दहावीतही ९० टक्के गुण मिळविले. दहावीत तीने केंद्रात व शाळेत अव्वल क्रमांक पटकावला. अकरावीमध्ये महिलांच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेपर्यंत तिने मजल मारली होती. जम्मू-काश्‍मीरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तसेच, गतवर्षी पुणे येथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ३२ मीटर लांबीमध्ये हातोडा फेकला होता.

यावेळी तिला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गतवर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ४२ मीटर लांबीमध्ये हातोडा फेकणाऱ्या खेळाडूचा प्रथम क्रमांक आला होता. मैथिलीही या वर्षी जोरदार सराव करीत आहे. दररोज सात तास सराव सुरू आहे. सध्या ती ४० मीटर लांबीमध्ये हातोडा फेकत असून ५० मीटर लांबीपर्यंत हातोडा फेकण्यासाठी सराव करते आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News