महाडमध्ये पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी नोकर भरतीचे शिबिर

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Saturday, 16 November 2019

महाड : केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये दहावी, बारावी आणि कोणत्याही शाखेतील पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी नोकर भरती जागा जाहीर झाल्या असून त्याची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी, यासाठी कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने १७ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम विकास सावंतस्‌ ॲकॅडमीतर्फे राबवला जात आहे. या शिबिराला मुंबईमधील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून या भरतीसाठी अर्ज करण्यासंदर्भातील सूचना, अर्ज करण्याची मुदत, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, कामाचे स्वरूप, इत्यादी अनेक प्रश्‍नांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. 

या वर्षी १२ वी व कोणत्याही शाखेतील पदवीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी केंद्र सरकार, रेल्वे, भारतीय पोस्ट विभाग, विमा कंपन्या व सरकारी बॅंकांमधील नोकरीच्या संधी व त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमके काय केले पाहिजे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन या शिबिरामधून होणार आहे. तसेच डिसेंबर २०२० पर्यंत जाहीर झालेल्या १९ बॅंकांमधील विविध पदांसाठीच्या भरतीच्या तारखांविषयक माहिती दिली जाणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण कडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News