मी अविवाहित, मात्र मला तीन वर्षांची एक मुलगी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019

'मी अविवाहित आहे, मात्र मला तीन वर्षांची एक मुलगी आहे. यापूर्वी मला कोणीही विचारलं नाही म्हणून मी याबद्दल कधीही बोलले नाही. ती माझ्यासोबत मुंबईत राहत असून माझे नातेवाईक तिची काळजी घेत आहेत' असंही माहीनं  एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

साहेब बिबी और गँगस्टर', 'देव डी' यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री माही गिल हिला लहान मुलगी देखील आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात तिला तीन वर्ष पूर्ण होणार आहेत, असा खुलासा केला.

मी माझ्या आयुष्यात खूप खूष आहे आणि माझ्या मुलीची जबाबदारी समर्थपणे पेलत आहे. तूर्त माझा लग्नाचा  विचार नाही', असंही तिनं स्पष्ट केलं. मात्र आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचंही तिनं कबुल केलं. 'माझा जोडीदार हा गोव्यात राहतो आणि मी अनेकदा त्याची भेट घेते, कदाचित आम्ही नंतर लग्नदेखील करू' असंही माही म्हणाली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News