कम्प्यूटरपेक्षा फास्ट म्हणजे महेंद्र सिंग धोनी, म्हणतो शोएब अख्तर, पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

वर्ल्ड कप 2019 : लाहोर : क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या तल्लख मेंदूला "रावळपिंडी एक्‍स्प्रेस' अर्थात शोएब अख्तरने सलाम ठोकला आहे. सामन्यातील स्थिती काय आहे, पारडे कुणाच्या बाजूने कसे झुकेल याचा अंदाज बांधण्याची धोनीची क्षमता इतकी विलक्षण आहे, की या बाबतीत त्याच्या आसपासही कुणी फिरकू शकणार नाही. त्याचा मेंदू कम्प्युटरपेक्षा फास्ट चालतो. एखाद्या विशिष्ट खेळपट्टीवर खेळण्याविषयी कम्प्युटर जे काही सांगेल त्यापेक्षा वेगाने धोनी विवेचन करेल, असे उत्स्फूर्त उद्गार अख्तरने काढले.

धोनीच्या या क्षमतेविषयी भितीयुक्त आदराची भावना अख्तरच्या मनात निर्माण झाली आहे. त्याने ट्‌विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून हेच स्पष्ट होते. त्याने धोनीच्या नेतृत्वकौशल्याचेही कौतुक केले आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News