महात्मा गांधीजी तत्वांना प्रामाणिक

सागर गवई
Friday, 25 January 2019

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमालेत रजनी बक्षी यांचे वक्तव्य

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमालेत रजनी बक्षी यांचे वक्तव्य

मुंबई : महात्मा गांधीजी आपल्या प्रत्येक तत्वांना प्रामाणिक होते. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन,सर्वधर्म समभाव, स्वदेशी, अस्पृश्यतेचा त्याग आणि निर्भयता या सर्व  तत्वांशी बापू म्हणजेच महात्मा गांधी आधारभूत होते. त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर सर्व तत्वांचे पालन करता येऊ शकते, असे वक्तव्य रजनी बक्षी यांनी केले. यावेळी  उपप्राचार्य डॉ. सुचेता केतकर, मराठी विभागप्रमुख लीना केदारे, प्रवीण चंद्र आदी. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यिनबझ आणि माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमालेचे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रजनी बक्षी यांनी 'गांधीजी और मतभेद की कला' या विषयावर बोलताना गांधीजींच्या जीवनातील अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. मतभेद असावा  पण मनभेद असू नये, या संकल्पनेवर रजनी बक्षी यांनी विश्लेषण दिले.

माणूस संपल्याने विचार संपत नाही, असेही मत त्यांनी यावेळी मांडले. महात्मा गांधी यांनी कशाप्रकारे विविध अडचणींना सामोरे जाऊन परिस्थितीचा सामना केला आणि कशाप्रकारे ते 'महात्मा' बनले  हे अनेक प्रसंगातून बक्षी यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. माणूस संपल्याने विचार संपत नाहीत या मुद्दयावरून रजनी यांनी उपस्थितांच्या अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न देखील केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News