‘गांधीजींना फक्त स्वछताप्रिय दाखवू नये’

सागर गवई
Thursday, 24 January 2019

 विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमालेत न्या. हेमंत गोखले यांचे मत

 विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमालेत न्या. हेमंत गोखले यांचे मत

मुंबई : महात्मा गांधीजींबद्दलचे गैरसमज समाजातून तसेच युवा पिढीतून  दूर करण्यासाठी सरकारने विविध उपक्रम राबवावेत. यासोबतच गांधीजींना केवळ स्वछता प्रिय  न दाखवता त्यांनी देशासाठी केलेलं कार्य समाजापुढे मांडावे. त्यांच्या मौल्यवान विचारांवर युवापिढीनी चालावे, असे मत माजी न्या. हेमंत गोखले यांनी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. अनुश्री लोकूर, मराठी विभागप्रमुख लीना केदारे, मराठी विभागाच्या प्राचार्य शिल्पा नेवी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
     यिनबझ आणि माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमालेचे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. 'महात्मा गांधी आणि मानवतावाद' या विषयावर गोखले यांनी मार्गदर्शन करताना महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना अनेक मुद्दे मांडले. यावेळी उपस्थितांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला दिव्यांगांची उपस्थिती लक्षणीय होती.
    गोखले पुढे बोलताना म्हटले की, जगातला सगळ्यात विद्वान असलेला गांधी भारतामध्ये मात्र सहजतेने घेतला जातो. प्रत्येक विषयात आपली वेगळी विचारधारणा गांधींनी अजरामर करून ठेवली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News