महाराष्ट्र संघाचे ज्यूदो स्पर्धेत यश

सकाळ (यिनबझ )
Saturday, 9 November 2019

या स्पर्धेत सोनाली वाजगे व लक्ष्मी जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले, साक्षी जाधव हिने रौप्य तर अंकिता कसबे, मुस्कान परदेशी, गीतांजली ढोबे व रेणुका साळवे यांनी ब्राँझ पदक पटकावले.

 

 

पुणे : हैदराबाद येथे झालेल्या ८ व्या राष्ट्रीय ब्लाइंड ज्यूदो स्पर्धेसाठी पुण्यातून १३ खेळाडूची निवड झाली होती. त्यातून २ सुवर्ण, एक रौप्य व ४ ब्राँझ अशा सात पदकांची कमाई करून महाराष्ट्र टीम ने सब ज्युनियर मुलींच्या गटात चॅम्पियनशिप मिळवली आहे. चॅम्पियनशिप ट्रॉफी समान गुण झाल्यामुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्र संघात विभागून दिली आहे. कोथरूड येथील पुणे अंधशाळा, मुलींची येथे गेल्या ५ वर्षांपासून मुली कॉमनवेल्थ सुवर्ण पदक विजेत्या रचना धोपेश्‍वर यांच्याकडून ज्यूदोचे प्रशिक्षण घेत आहेत.

या स्पर्धेत सोनाली वाजगे व लक्ष्मी जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले, साक्षी जाधव हिने रौप्य तर अंकिता कसबे, मुस्कान परदेशी, गीतांजली ढोबे व रेणुका साळवे यांनी ब्राँझ पदक पटकावले. पुणे अंधशाळेच्या विश्वस्त मृणालिनी पवार, सचिव महेंद्र पिसाळ, प्रशासकीय अधिकारी योगिनी जत, कृष्णा शेवाळे, मुख्याध्यापक राजाराम जगताप, क्रीडा शिक्षिका राणी मदने यानी सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले. ज्युडो छत्रपती पुरस्कार विजेते महेश मते यांनी खेळाडूंचे कौतुक केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News