महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद..! मराठमोळे मनोज मुकुंद नरवणे लष्कराच्या उपप्रमुख पदी

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Tuesday, 23 July 2019

यापदी नियुक्ती झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहेत.

नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापदी नियुक्ती झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहेत.

सध्या पूर्व कमांडचे प्रमुख असलेले नरवणे लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. अंबू हे ३१ डिसेंबरला निवृत्त होणार आहेत. नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. रावत हे ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत

लेफ्टनंट जनरल नरवणे हे मूळ पुण्याचे आहेत. आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये काम केले आहे..राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्धी आहेत. ते जून १९८० मध्ये शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७व्या बटालियनमध्ये दाखल झाले होते. आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत त्यांनी ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरसह श्रीलंकेतील भारतीय शांतता सुरक्षा बलाचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका राष्ट्रीय रायफल्स बटालियन आणि ईशान्येत एका इन्फेन्ट्री ब्रिगेडचं नेतृत्व केलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News