सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील आमदारांना धास्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 13 November 2019

मुंबई: कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय बुधवारी (ता.13) सुप्रीम कोर्टाने दिला. मात्र, या आमदारांना पुन्हा निवडणूक लढविता येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रातील आमदारांना धास्ती लागली आहे.

महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहूमत मिळाले नाही. त्यामुळे आमदारांची जुळवाजुळव करताना राजकीय नेत्यांना घाम फुटत आहे. आमिष दाखवुन आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे कोणताही आमदार बंडखोरी करण्यासाठी तयार नाही. बंडखोरी केलीच तर आमदारकी रद्द होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदार धास्तावले आहेत. 

न्यायमूर्ती एन व्ही रमना, संजीव खन्ना आणि कृष्ण मुरारी  या तीन सदस्य असलेल्या बेंचने निर्णय दिला. बंडखोर आमदारांच्या याचिकेदरम्यान कोर्टाने म्हटले की 'नैतिकता ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांना लागू आहे' त्यामुळे आमदारांना आता पक्षासोबत एकनिष्ठ रहावे लागणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News