महाराष्ट्र दुष्काळात आणि साहेबांची सेना अयोध्येला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • उद्धव ठाकरे १६ जूनला अयोध्येला
  • सर्व खासदार सोबतीला
     

मुंबई - शिवसेनेच्या १८ खासदारांना घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ जूनला अयोध्येला जाणार आहेत. राम मंदिराचा मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्या दौरा केला होता. 

माजी खासदार आणि राम जन्मभूमी न्यासचे अध्यक्ष रामविलास वेदांती याबाबत म्हणाले की, केंद्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पूर्ण बहुमत मिळाले आहे. नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अयोध्येत येऊन आम्ही सरकारला राम मंदीर उभारण्याची आठवण करून देऊ इच्छितो.

उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या माध्यमातून सरकारने वचन न विसरता राम मंदिराच्या बांधणीला सुरवात करावी याची आठवण करून दिली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील येथे रामाच्या दर्शनाला यायला हवे. उद्धव यांनी नुकतेच नवनिर्वाचित खासदारांसह कार्ल्याच्या

एकवीरा देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर काल (गुरुवारी) कोल्हापूरच्या अंबाबाईचेही दर्शन घेतले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे सर्व खासदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News