उद्या मंत्रिमंडळ विस्तार निश्चित; विखे, क्षीरसागर, अविनाश महातेकर उद्या शपथ घेणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
 • मंत्रिपदासाठी  कोणाची नावे चर्चेत?
 • भाजपकडून कोणाची नावे चर्चेत?
 • नवी 7 मंत्रिपदे, विखे-क्षीरसागरांना मानाचं पान?    

मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात  बैठक झाली. मातोश्रीवर शुक्रवारी ही बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांनी  ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीची माहिती दिलीय. उद्या म्हणजे 16 जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, उद्याच सकाळी 11 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल. रविवारी शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकतात. 

मंत्रिपदासाठी  कोणाची नावे चर्चेत?

 • जयदत्त क्षीरसागर(शिवसेना)
 • तानाजी सावंत (शिवसेना)
 • अविनाश महातेकर (आरपीआय)

भाजपकडून कोणाची नावे चर्चेत?

 • राधाकृष्ण विखे पाटील
 • संजय कुटे
 • आशिष शेलार
 • अनिल बोंडे

मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीतून सेनेते आलेले जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश निश्चित मानला जात आहे.  याशिवाय या विस्तारात मित्रपक्षांनाही स्थान देण्यात आलं आहे. रामदास आठवले यांच्या रिपाईलाही मंत्रिपद मिळणार आहे. आठवलेंकडून अविनाश महातेकर यांचे नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे. 

   

  Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

  Download Samvad App

  Related News