‘महाराष्ट्र बहुजन’ करणार काँग्रेस सोबत युती, या व्यक्तीने दिला दुजोरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र बहुजन आघाडीचे निमंत्रक निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. वळसेपाटील यांनी दिली.

ठाणे : देशात जातीयवादी शक्तींची ताकद वाढत आहे. अशा वेळी या शक्तीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शंभरपेक्षा जास्त संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र बहुजन आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र बहुजन आघाडीचे निमंत्रक निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. वळसेपाटील यांनी दिली.

ठाण्यात पक्षाच्या बैठकीसाठी आलेले असताना आयोजित पत्रकार परिषदेत वळसेपाटील बोलत होते. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एक उमेदवाराच्या विरोधात एकच उमेदवार दिल्यास लढत देणे योग्य होईल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. अशा वेळी समविचारी पक्षांनी प्रसंगी त्यागाची भूमिका ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

बारा बलुतेदार परिवर्तन नावाची संकल्पना घेऊन कमीत कमी १०० पेक्षा अधिक संघटनांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचा राष्ट्रीय महासचिव या नात्याने मी या संघटनांची बैठक घेतली. या सर्व संघटनांनी कुठल्याही अटींशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र बहुजन विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार राजकारणात आततायीपणा करायचा नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News