महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचा बार १० ऑक्टोबरला ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 July 2019
  • आचारसंहिता १० किंवा १५ सप्टेंबरपासून लागू होऊ शकते 
  • जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा अंदाज

नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक १० किंवा १३ ऑक्‍टोबरला होईल, असा अंदाज राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज व्यक्त केला. तसेच, आचारसंहिता १० किंवा १५ सप्टेंबरपासून लागू होऊ शकते, असेही ते म्हणाले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गेल्या महिन्यात, १५ ते २० ऑक्‍टोबरदरम्यान निवडणूक होण्याची शक्‍यता असल्याचे म्हटले होते. 

‘महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री’ 
नगर : लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने संघटनकौशल्यावर निवडणूक जिंकली. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. काही मंत्र्यांचा अपवाद वगळता, कोणावरही आरोप झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्‍वास भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी व खासदार सरोज पांडे यांनी रविवारी व्यक्‍त केला. भाजप कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी पांडे आज येथे आल्या होत्या.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News