महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019

भारत हा कृषिप्रधान देश आहे. जगातील सर्वात जास्त पशुधन आपल्याकडे उपलब्ध असल्याचे पहावयास मिळते. अनेक विज्ञान शाखा विस्तारत असताना विद्यार्थ्यांचा ओढा अनेकवेळा तंत्रज्ञानावर आधारित शाखांकडे जास्त असल्याचे दिसून येते. तसेच अनेक शाखा प्रचलित शाखा म्हणून समोर न आल्याने त्याकडे प्रवेश घेण्याचा कल दिसून येत नाही. अनेकदा पूर्वग्रहदूषित झाल्याने किंवा अपुऱ्या ज्ञानामुळे चांगल्या संधी हातातून निसटण्याची शक्यता असते. आजकाल पशुवैद्यकीय क्षेत्रही नव्याने संशोधनात अग्रेसर ठरत आहे. कृषी विकासाचा विचार करता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात सुसंधी उपलब्ध होतील.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. जगातील सर्वात जास्त पशुधन आपल्याकडे उपलब्ध असल्याचे पहावयास मिळते. अनेक विज्ञान शाखा विस्तारत असताना विद्यार्थ्यांचा ओढा अनेकवेळा तंत्रज्ञानावर आधारित शाखांकडे जास्त असल्याचे दिसून येते. तसेच अनेक शाखा प्रचलित शाखा म्हणून समोर न आल्याने त्याकडे प्रवेश घेण्याचा कल दिसून येत नाही. अनेकदा पूर्वग्रहदूषित झाल्याने किंवा अपुऱ्या ज्ञानामुळे चांगल्या संधी हातातून निसटण्याची शक्यता असते. आजकाल पशुवैद्यकीय क्षेत्रही नव्याने संशोधनात अग्रेसर ठरत आहे. कृषी विकासाचा विचार करता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात सुसंधी उपलब्ध होतील. पशुधनात आणि दुध उत्पादनात जगात आपण सर्वोत्तम ठरलो आहोत. मित्रहो पशुवैद्यकीय क्षेत्र (Veterinary Science) मधील करिअरच्या संधी निश्चित फायद्याच्या ठरतील.

कामाच्या संधी

पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधरांना करिअरच्या उत्तम संधी मिळतात. राज्य सरकारच्या पशुवैद्यक दवाखान्यांमध्ये नोकरी मिळू शकते. खासगीरीत्याही व्यवसाय करता येऊ शकतो. पाळीव प्राण्यांच्या देखभाल-तंदुरुस्तीकडे लोक काटेकोरपणे लक्ष देतात. त्यामुळे चांगल्या पशुवैद्यकांना उत्तम करिअर करता येऊ शकते. पशुवैद्यकास राज्यसेवा परीक्षा आणि केंद्रीय नागरी सेवांद्वारे अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारी प्रशासकीय नोकऱ्या मिळू शकतात. कृषी प्रकिया उद्योग, मोठे दुग्धप्रकिया उद्योग आदी क्षेत्रांतही संधी मिळू शकते. भारतीय सैन्यामध्ये त्यांच्या विविध प्रकारच्या अ‍ॅनिमल स्कॉड व अ‍ॅनिमल फार्मसची काळजी घेण्याकरीता दरवर्षी मुबलक संख्येमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना मागणी असते. याखेरीज सरकारी क्षेत्रामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पशुसंवर्धनविषयक धोरणांच्या अंमलबजावणीकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी असते.

थोडेसे अभ्यासक्रमाविषयी

राज्यात पाच वर्षांचा पशुवैद्यक (B.V.Sc. and A.H) अभ्यासक्रम कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डॉक्टर पदवी मिळते. यात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (M.V.Sc) हा दोन वर्षाचा अभ्यासक्रमही आहे. तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. बारावी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी

संकेतस्थळ- www.mafsu.in

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News